March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 5) – भरधाव जाणाऱ्या दुचाकीने एका पादचाऱ्यास जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात रविवारी 1 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास बजाजनगर वडगाव रोडवर झाला.

याबाबत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचा आशय असा की, सलामपुरेनगर वडगाव (कोल्हाटी) येथील भास्कर घुसळे हे भोंडवे शाळा वडगाव ते आण्णाभाऊ साठे चौकाकडे पायी घरी येत होते. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या लाल रंगाच्या हिरो होंडा दुचाकी (एम एच 05, ए क्यू -9437) चा चालक दिपक राजेंद्र बनकर रा. सलामपुरे वडगाव (कोल्हाटी) याने पाठीमागुन येवुन घुसळे यांना जोराची धडक दिली. बजाजनगर येथील भोंडवे शाळेजवळील चौकात 1 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भास्कर घुसळे यांच्या डोक्याला मागे मार लागल्याने घाटी दवाखाना अपघात विभाग दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रुपेश भास्कर मुसळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *