March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.11) – दिव्यांग आधार व पुनर्वसन बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिन शनिवारी (ता.8) रोजी दिव्यांग आधार संस्थेच्या कार्यालयाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा गौरव करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र बजाजनगर येथील दिव्यांग आधार व पुनर्वसन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात एका दिव्यांग महिलेले स्वतःची चार्जिंग सायकल दुसऱ्या दिव्यांग महिलेला भेट म्हणून दिली.

संस्थेच्या वतीने शिवकन्या पाडेकर, नंदा सरोदे, शिवानी वाकडे, मनीषा कुलकर्णी, तारा पंडूरे या पाच दिव्यांग महिलांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्वान महिला म्हणून कल्पना मानकर, चंद्रकला शिंदे, विद्या उगले, ॲड मंजुषा करपे, वाळुज एमआयडीसी ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यश्री शिंदे, ॲड.मंजुषा करपे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक कैलास भोकरे दिव्यांग आधार संस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ वाकडे, उपाध्यक्ष पारसचंद साकला, संस्थेचे सचिव विष्णुदास पाटील, सदस्य किशोर फेगडे, लक्ष्मण धडेकर, गणेश आहेर, शिवाजी दांगट, विठ्ठल भवर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भोकरे यांनी दिव्यांगांना जागतिक महिला दिना निमित्त मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ॲड.मंजुषा करपे, संतोष उगले आणि दिव्यांग महिला शिवानी वाकडे यांनी मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास बजाजनगर परिसर येथील योगगुरु जनार्दन नवसरे, उद्योजक श्रीकृष्ण जयस्वाल, मराठे साहेब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल पाटील, कैलास चव्हाण, रूपचंद अग्रवाल, कृष्णा गुंड, तेजेश जैन, ज्ञानेश्वर भोरगीर, अशोक मानकर, डॉ. महादेव संकपाळ, राजू गोरगिले, राजेंद्र शिंदे, संजय फलटणे, दशरत मात्रे तसेच परिसरातील दिव्यांग महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णूदास पाटील यांनी, सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष दत्ता वाकडे यांनी तर आभार शिवाजी दांगटराजे यांनी मानले.

दिव्यांग महिलेला चार्जिंगची सायकल –
या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग महिला संध्या कुलकर्णी यांना चार्जिंगची सायकल मीरा घुमरे या दिव्यांग महिलेकडून देण्यात आली. एका दिव्यांग महिलेने दुसऱ्या दिव्यांग महिलेला केलेल्या या मदतीची वाळूज महानगरात मोठी चर्चा होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *