वाळूजमहानगर (ता.14) : – ग्रामपंचायतच्या उत्पन्नातील दिव्यांगांसाठी देण्यात येणारा 2021/22 चा 5 टक्के निधी त्वरित देण्यात यावा. या मागणीचे पत्र प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने वडगाव (को.) – बजाजनगर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना सोमवारी (ता.14) रोजी देण्यात आले.
सरपंच सुनील काळे व ग्रामविकास अधिकारी बि.एल.भालेराव यांना दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्तींचा पाच टक्के निधी लवकर देण्यात यावी व दिव्यांगांच्या विविध मागण्या तात्काळ सोडवा. यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख पारसचंद साकला, जिल्हा सचिव जोतीराम जाधव, पश्चिम तालुका अध्यक्ष बद्रीनाथ लघाने पाटील, पश्चिम तालुका महिला अध्यक्षा सुनिताताई जाधव, पश्चिम तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ वाकडे, पश्चिम तालुका उपाध्यक्ष किशोर फेगडे, वाळूज महानगर अध्यक्ष शिवाजी दांगट, वडगावचे शाखाध्यक्ष सुभाष पाईकराव, लक्ष्मण धडेकर, बाबुराव फटाले, बिभीषण शेळके, दत्तू लघाने पाटील, मीराताई ठेंग, लताताई पिंपळे, सुनील कांबळे, अलका थोरात, मयूर पांडे, विकी खर्च, मीना पवार, भास्कर पडघन आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थिती होते.
पन्नास टक्के सवलत देण्याचे आश्वासन –
यावेळी सरपंच सुनील काळे यांनी आश्वासन दिले की, लवकरात लवकर निधी देऊ व दिव्यांग महिलांना ग्रामपंचायत मार्फत स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊ तसेच ग्रामपंचायत घरपट्टी 50 टक्के व नळ कोटेशन 50 टक्के दिव्यांगांकडून घेण्यात येईल. व 50 टक्के माफ करण्यात येईल. तसेच विविध मागण्याबद्दल चर्चा करू त्या मार्गी लाऊ. असे आश्वासन सरपंच सुनील काळे यांनी दिले.