वाळूजमहानगर – चिंचबन कॉलनी, बजाजनगर येथील दिलीप शिवाजी दबडे यांच्या मातोश्री आक्काताई शिवाजी दबडे यांचे राहत्या घरी सोमवारी (ता 3) ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बजाजनगर येथील स्मशानभूमी (मुक्तीधाम) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाळूज महानगरातील सर्व स्तरातील नागरीकांची उपस्थिती होती.