March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.7) – वारंवार त्रास देत असल्याने एका महिलेने फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला बोलावून घेतले. तो नशेत तर्रर्र होऊन ठाण्यात आला. दोघांचेही म्हणणे समजून घेत असताना तो मध्येच बडबड करत होता. म्हणून त्याला बाजूला बसण्यास सांगितले. त्यामुळे अटकेच्या भीतीने घाबरलेल्या दारुड्याने पळून जाण्यासाठी पोलीस ठाण्याच्या बाथरूम वरून उडी मारली. त्यात तो जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले. ही खळबळजनक घटना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.6) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.


या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, एक दारोडा एका महिलेला वारंवार त्रास देत आहे. त्यामुळे तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध व दखलपात्र गुन्हा नोंदवत त्याला बोलावून घेतले. दारूच्या नशेत तो पोलीस ठाण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला दिला. पोलीस तक्रारदार महिलेचे म्हणणे ऐकून घेत असताना, तो सतत मध्येच बडबड करत होता. म्हणून पोलिसांनी त्याला बाजूला बसण्यास सांगितले. त्यामुळे त्याला वाटले की, पोलिस आता आपल्याला अटक करतील. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा बेत आखला. पोलीस ठाण्याच्या बाथरूमच्या मागील भिंतीवरून त्याने बाजूलाच्या खिंवसरा कॉम्प्लेक्सच्या आवारात उडी मारली. कॉम्प्लेक्सच्या आवारात भूमिगत पार्किंग आहे. त्यामुळे तो सुमारे पंधरा ते वीस फूट खोल पडल्यामुळे जखमी झाला. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित त्याच्या मित्रांना बोलावून त्याला दुचाकी (एम एच 20, एफ एल- 9515) वर ट्रिपल सीट बसवून नेले. दारुड्याने केलेल्या या प्रतापामुळे एमआयडीसी पोलीस ठाणे व परिसरात खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *