March 23, 2026

वाळूज महानगर, (ता. 2) – वाळुजकडून गंगापूरकडे जाताना अंदाजे 40 वर्षीय महिला दुचाकीवरून पडून जखमी झाली. हा अपघात सोमवारी (ता. 2) रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दहेगाव बंगल्या जवळील हॉटेल सृष्टी समोर झाला.


या आपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज जवळील लांझी येथील कल्याण कडुबा सातपुते अंदाजे वय 45 आणि सुनिता किसन सातपुते अंदाजे 40 असे दोघे दुचाकी (एम एच 20, बी एम -7331) वरून गंगापूरकडे जात होते. दुचाकी दहेगाव बंगला येथील सृष्टी हॉटेलजवळ येतात सुनिता सातपुते यांना चक्कर आल्याने त्या खाली पडून जखमी झाल्या. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास झाला. या अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी पॉईंटवर असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी अपघात स्थळी हजर होऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *