वाळूजमहानगर, (ता.27) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत वाळूज येथील श्री.साईनाथ विद्यालयाचा 91.66 टक्के निकाल लागला.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 132 विद्यार्थी बसले होते. यामध्ये विशेष प्राविण्यासह 33 विद्यार्थी, प्रथम श्रेणीतून 45 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीतून 24 विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीतून 19 विद्यार्थी असे एकूण 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये आरती माधव आव्हाड 89 टक्के गुण मिळवून प्रथम, सेजल रामभाऊ खंडागळे 88.20 द्वितीय, तन्वी अनिल बोर्डे 87.00 मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विलासराव राऊत, संस्थेच्या कोषाध्यक्षा प्रमिलाताई राऊत, तसेच प्राचार्या वंदना बेडसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.