March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.2) – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेला वाळूज परिसरात गुरुवारी (ता.2) रोजी मोठ्या उत्साहात व शांततेत सुरुवात झाली. वाळूज येथे 3 परीक्षा केंद्रावरून 813 विद्यार्थी ही परीक्षा देत आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी वाळुज येथील जिल्हा परिषद शाळा केंद्र क्रमांक 1236, महाराष्ट्र मराठी हायस्कूल केंद्र क्रमांक 1237 व सरस्वती विद्यामंदिर वाळूज केंद्र क्रमांक 1238 या तीन केंद्रावरून ही परीक्षा होत आहे. गुरुवारी (ता.2) रोजी दहावीचा पहिलाच पेपर मराठी व उर्दू माध्यमाचा आहे.

या परीक्षेसाठी जिल्हा परिषद वाळूज येथे 287 विद्यार्थी 12 हॉलमधून परीक्षा देत आहे. येथे केंद्रप्रमुख म्हणून सी एन गवळी तर सह केंद्रप्रमुख म्हणून कारभारी जाधव हे काम पाहत आहे. तसेच बैठे पथककात एस एस सपकाळ यांचा समावेश आहे.

केंद्र क्रमांक 1237 महाराष्ट्र मराठी हायस्कूल येथे एकूण 239 परीक्षार्थी 12 हॉल मधून ही परीक्षा घेत आहे. येथे मराठी माध्यमाचे 235 तर उर्दू माध्यमाचे 4 विद्यार्थी परीक्षा देत आहे. येथे 7 विद्यार्थी गैरहजर असल्याचे केंद्रप्रमुख रवींद्र उकर्डे व सहकेंद्र प्रमुख संजय गुट्टे यांनी सांगितले.

तसेच सरस्वती विद्यामंदिर या 1238 केंद्र क्रमांक असलेल्या परीक्षा केंद्रात 287 परीक्षार्थी 15 हॉलमधून परीक्षा देत आहे. या केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून शारदा खोत, सहकेंद्र प्रमुख कृष्णा वनारसे तसेच बैठे पथकामध्ये फिरोज तडवी, चित्रा खोचे आणि भगवान खांडेकर हे लक्ष ठेवून आहे.

पहिल्याच दिवशी या केंद्रावर सहा विद्यार्थी गैरहजर असल्याचे दिसून आले. अत्यंत शांततेत सुरूवात झालेल्या सर्व केंद्रावर परीक्षार्थींसाठी चोख व्यवस्था दिसून आली. शिवाय वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बजाजनगर व रांजणगाव (शेणपुंजी) येथेही दहावीच्या परीक्षेला गुरुवारी (ता.2) रोजी शांततेत सुरुवात झाली.

बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयात 277, शहीद भगतसिंह विद्यालयात 187, स्व. भैरोमल तनवाणी विद्यामंदिर, लाल बहादूर शास्त्री विद्यालय व अल्फोंसा इंग्लिश स्कूल येथे 235 विद्यार्थी परीक्षा देत आहे. तसेच रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिरात 498, जिल्हा परिषद रांजणगाव शाळेत 322, श्री शिवाजी विद्यालयात 218 विद्यार्थी परीक्षा देत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *