वाळूजमहानगर, (ता.27) -एसएससी बोर्ड परीक्षा मध्ये रांजणगाव (शेणपुंजी) येथील राजर्षी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत पठाण मशिरा वाजेदखा हिने 96.60 टक्के घेऊन रांजणगाव (शेणपुंजी) मधून प्रथम येण्याचा मान मिळवला.
या परीक्षेत राजश्री शाहू विद्यालयाचे खंदारे समीक्षा संतोष 94.60, निर्मळ निलेश आनंदा 94.40, कानकाटे समर्थ गंगाधर 93.40, डांबरे साक्षी नारायण 92.20, चोथे उज्वल विठ्ठल 91.80, सोनवणे ऋतिक अशोक 91.40, खिस्ते रोहन भारत 90.40, रोकडे गुंजन शेषराव 89.40, श्रावणी महेर 88.60, गुरुप्रसाद साबळे 88.20, जाधव कार्तिक विठ्ठल 88.20, जाधव ऐश्वर्या बाबासाहेब 86.20, मुळे प्रणव शंकर 85.80, चाळके किरण काशिनाथ 85.40, राठोड रोहन विजय 84.60, जंजाल सागर 84 टक्के गुण मिळवून अनुक्रमे उत्तीर्ण झाले.
दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत शाळेचे संचालक विकास सवाई, मुख्याध्यापक प्रीती देवकर व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.