वाळूज महानगर – शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने निकाल दिल्याने वाळूज येथे शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (ता.23) सप्टेंबर रोजी फटाक्याची आतिशबाजी करून व पेढे वाटून आनंदोउत्सव साजरा केला.
शिवसेना विभागप्रमुख बाळासाहेब चनघटे यांच्या नियोजनाने वाळूज येथील महामार्गावर झालेल्या आनंदोत्सवात जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, उपतालुकाप्रमुख मनोज पिपंळे, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर पाटील, गटप्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख नंदकुमार, शाखाप्रमुख विश्वनाथ थोरात, युवा सेना शहर प्रमुख सौरभ वैद्य, युवा सेना विभाग प्रमुख अमोल बोद्रें, कैलास पवार, महेश पवार, नारायणपूर शाखाप्रमुख खालेद पटेल, सुरज बत्तीसे, हरी काळे, सचिन जमधडे, सुखदेव गुंजाळ, आनिल सोनवने, देवेंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.