
वाळूजमहानगर, (ता.24) – कंपनी बंद करून कामगार व मालक घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील दरवाजा तोडून कंपनीतील मशीनचे कॉपर वायर, झिंक मेटल, काँपर रॉड असा जवळजवळ 20 किलो वजनाचा व अंदाजे 35 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (ता.21) रोजी सकाळी उघडकीस आली. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नवनाथ काकासाहेब सुलताने वय- 40 वर्षे, धंदा- व्यवसाय, रा तिरुपती हौसिंग सोसायटी, सिडको वाळुज महानगर – 1 छत्रपती संभाजीनगर हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील डब्लु सेक्टर प्लाट नं. 51 वैष्णव देवी मंदिराजवळ सितामाई इंटरप्राईजेस या कंपनीत टु व्हीलरचे स्पेअर्स पार्ट बनविणे व विक्री करण्याचे काम करतात. शनिवारी (ता.20) रोजी सायंकाळी 8 वाजता कामगार घरी निघुन गेल्यानंतर सुर्याने यांनी कंपनी बंद करुन घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी 
कंपनीच्या पाठीमागील दरवाजा तोडून कंपनीमधील मेटल फिनिश शेफ्टी मशीनचे कॉपर वायर, झिंक मेटल, काँपर रॉड असा जवळजवळ वीस किलो वजनाचा व अंदाजे 35 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नवनाथ सुलताने यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
