February 5, 2026

 

वाळुज महानगर – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहली अंतर्गत ऐतिहासिक वस्तूंना नुकत्याच भेटी देऊन, त्या वास्तूचे अवलोकन केले. या विद्यार्थ्यांसोबत इतिहास विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बजाजनगर येथील इतिहास विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल 28 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिस्टॉरिकल म्युझियम व ऐतिहासिक वास्तू बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात आली. दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज येथील इतिहास विभाग सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन शैक्षणिक वर्षांमध्ये करत असतो. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास माहिती व्हावा. या दृष्टीने यावर्षी सहलीचे नियोजन केले होते. या शैक्षणिक सहलीत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भेटीनंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी प्रा. डॉ. सचिन साळवे यांनी विद्यार्थ्यांना मध्ययुगीन शस्त्र आणि कला स्थापत्य यावर माहिती दिली. या सहलीच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सचिन साळवे प्रा. डॉ. राम भोसले यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *