March 23, 2026

 

वाळूजमहानगर, ता.30) – बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण विभागच्या अंतर्गत शनिवारी (ता.29) रोजी हेल्थ अँड वेलनेस या विषयावर राजश्री शाहू महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. मधुकर वाकडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर होते. या व्याख्यानामध्ये डॉ.वाकळे यांनी शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक आरोग्याविषयी जागरूकता असेल तर मनुष्याचा सर्वांगीण विकास व यश प्राप्त होते. हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला, आजची युवा पिढी ही स्वतःला वेळ देण्यापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व देत आहे. यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता खूप जास्त आहे. शारीरिक शिक्षण विषय हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना रोज सकाळ, संध्याकाळ स्वतःसाठी एक तास द्यावा असेही वाकळे म्हणाले. तसेच एप्रिल आणि मे हा महिना उन्हाच्या कडाक्याने 40 अंश सेल्सिअस वाढत असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. असा सल्ला देत अत्यंत सोप्या शब्दात हेल्थ आणि वेलनेसचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय सांभाळकर यांनी हेल्थ अँड वेलनेस हा विषय विद्यार्थी युवा भारत सक्षम करण्याकरिता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्वाचे स्थान दिले आहे. याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.भरतसिंग सलामपुरे यांनी प्रास्ताविक केले, तसेच डॉ. अनिता पारगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अनिल तांबे, अमोल वाघमारे, अनिल पेरकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *