
वाळूजमहानगर, ता.18 (बातमीदार) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर मधील दगडोजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रोफेसर डॉ. संजय सांभाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अगोदर डॉ सांभाळकर यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रभारी प्राचार्य तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक आदी पदावर कार्य केल्याचा अनुभव आहे. या अनुभवामुळे डॉ. संजय सांभाळकर यांची पुन्हा एकदा त्यांच्यावर उपप्राचार्य पदाची जबाबदारी संस्थेचे संस्थापक सचिव विजय राऊत, विलास राऊत यांनी दिली. त्यांच्या या नियुक्तीबद्दल शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
