
वाळूजमहानगर, (ता.28) – औरंगाबाद नगर महामार्गावरील बजाज कंपनी समोर असलेल्या आयसिम कॉलेजच्या कर्मचाऱ्याने गेल्या आठ दिवसापासून विविध मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात वाळूज ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण कर्ते तसेच आयसिम कॉलेजच्या संचालक मंडळाशी बुधवारी (ता.28) रोजी चर्चा केली. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. असे आश्वासन मिळाल्याचे ग्रामपंचायत सदस्यांकडून सांगण्यात आले.
वाळूज येथील भाऊसाहेब शेजुळ यांचे मागील 8 दिवसांपासून आयसीम कॉलेजच्या विरोधात विविध मागण्यांसाठी उपोषण चालु आहे. वाळूज ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य अमजदखा पठाण, सचिन काकडे, नदीम भाई झुंबरवाला, दयानंद माने, पोपट बनकर व भारतीय जनता पार्टीचे रामेश्वर मालुसरे यांनी उपोषणकर्ते भाऊसाहेब शेजुळ यांची बुधवारी (ता.28) रोजी भेट घेऊन तसेच आयसीम कॉलेज व संस्थेच्या संचालक मंडळाची भेट घेऊन चर्चा केली. या उपोषणाबाबत येत्या दोन दिवसात तोडगा काढण्यात येईल. असे सकारात्मक आश्वासन संस्थेच्या वतीने देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सचिन काकडे यांनी आर के न्यूज लाईव्ह बरोबर बोलताना दिली. त्यामुळे हे उपोषण लवकरच सोडण्यात येईल. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
