March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.25) – भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील बहिण भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ईसारवाडी फाट्यावर शुक्रवारी (ता.22) दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातीलआरोपी आयशर चालक फरार आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चैतन्यनगर, पडेगाव येथील शेख निजाम शेख बिस्मिल्ला यांचा मुलगा
निराज शेख व मुलगी नमेरा साबेर असे शुक्रवारी (ता.22) दुपारी 4 वाजेच्या सुमारास दुचाकी (एम एच 20, एफ क्यु -2127) वरून ईसारवाडी फाटा मार्गे बिडकीनकडे जात असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक (एम एच 04, डी के -1533) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व हलगर्जीपणाने चालवून च्या दुचाकीला जोराची धडक देऊन निराज शेख व मुलगी नमेरा साबेर या दोघांच्याही मृत्यूस कारणीभूत ठरला. म्हणून आरोपी आयशर ट्रक चालता विरुद्ध कलम 304(अ), 337, 338, 279 भादंविसह कलम 134 मो वा कायद्याप्रमाणे वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कारभारी देवरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *