February 5, 2026

 

वाळूज महानगर, (ता 18) – वाळुज परिसरात मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या एका विवाह सोहळ्यात पीएमओ सचिव कार्यालयातील अधिकारी असल्याचा बनाव करुन सत्कार स्विकारणाऱ्या त्या तोतायाला व त्याच्या बॉडीगार्डला पोलिसांनी सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील हॉटेल ग्रँड सरोवर तिसगाव येथे रविवारी 16 नोव्हेंबर रोजी रामजी कुलकर्णी यांच्या मुलीच्या विवाह सोहळा होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याने तेथे कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. या कार्यक्रमातील सत्कार समारंभात अशोक ठोंबरे (पीएमओ सेक्रेटरी) असे नाव माईक मध्ये स्वागतासाठी स्वागतासाठी पुकारले होते. परंतु तसा कोणताही अधिकारी शहरात नसल्याने पोलिसांना ठोंबरे बाबत शंका आली. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली असता तो तोतया अधिकारी असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला व त्याचा साक्षीदार बॉडीगार्ड विकास पांडागळे या दोघां विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी 17 नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. पुढील तपास सपोनि. नरेश ठाकरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *