March 23, 2026


वाळूज महानगर (ता.11) – मोरे चौकातून जाऊन येतो. असे म्हणून सिडको वाळूज महानगर -1 येथील घरातून गेलेला 23 वर्षीय तरुण अद्यापही घरी न परतल्याने तो हरवल्याची नोंद रविवारी 9 नोव्हेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राधेश्याम विष्णु शिंदे, (वय 23 वर्ष), हा तरुण घरातून मोरे चौकात जावून येतो. असे म्हणुन रविवारी 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास घरातून निघून गेला. मात्र तो अद्यापही परत घरी आला नाही. त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. याप्रकरणी विष्णु जयराम शिंदे, वय- 44 वर्षे, व्यवसाय चालक, रा. सिडको महानगर 1 यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हवालदार संतोष सूर्यवंशी करीत आहे. वय 23 वर्ष, चेहरा- गोल, वर्ण- गोरा, उंची 5 फुट अंदाजे, बांधा- मजबूत, केस- काळे, डोळे -बारीक व काळे, नाक- सरळ, पोषाख- पॅन्ट शर्ट असे त्याचे वर्णन असून त्याच्याकडे 8080623011 या नंबरचा एक मोबाईल आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *