March 25, 2026

तुर्काबाद, (प्रतिनिधी)- एका दुकानात गोमांस विक्री करण्यासाठी बाळगताना आंबेलोहळ येथील 21 वर्षीय आरोपी मिळून आला. त्याच्या ताब्यातून गोवंश मांस व तीन धारदार मोठे चाकू जप्त करण्यात आले. ही कारवाई महिला गोरक्षकाच्या दक्षतेमुळे वाळूज पोलिसांनी तुर्काबाद येथे 27 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद (खराडी) येथे गोमांश विक्री होत असल्याचे महीला गोरक्षक नयना राजपुत (वय 29 वर्षे) रा. बजाजनगर यांच्या शुक्रवारी 27 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास निदर्शनात आले. त्यांनी ही माहिती वाळूज पोलिसांना कळवली. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, पोउपनि. अजय शितोळे, पोह. दत्तात्रय गढेकर, पो.अं. पांडुरंग शेळके यांच्या पथकाने खात्री केली असता तुर्काबाद येथील एका दुकानात अरबाज जाबीर कुरेशी (वय 21 वर्षे) रा. अंबेलोहळ ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर हा मांस विक्री करतांना मिळुन आला. त्याच्या ताब्यात काळ्या रंगाचे मासांचे तुकडे वजडी सारखे, एक हाडाचा लहान तुकडा व एक लहान मांसाचे तुकडे असे अंदाजे 1 किलो मांस व तीन मोठे चाकु व एक टोचा मिळुन आला. या मांसाबाबत व तसेच मांस हे कोठुन आणले, ते कोणत्या जनावराचे आहे, हे जनावर कोठे कापण्यात आले. याबाबत अरबाज जबीर कुरेशी याच्याकडे चौकशी केली असता त्याने काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यामुळे मांस हे गोवंश असल्याचा संशय असल्याने ते व हत्यारे दोन पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन जप्त करण्यात आले.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी अरबाज जाबीर कुरेशी (वय 21 वर्षे) रा. अंबेलोहळ ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरुध्द महाराष्ट्र प्राणी संवर्धन अधिनियम कलम 5 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश राठोड एक करीत आहे.

मांसाचे नमुने प्रयोग शाळेत –
हे मांस नक्की कशाचे आहे. याबाबत खात्री करण्याकरीता वाळूज पोलीस ठाण्यात येथे पशु वैद्यकिय अधिकारी यांना पाचारण करुन त्यांच्याकडुन मांसाचे नमुने डी.एन.ए. तपासणीसाठी संकलित करुन वेगवेगळ्या बरण्यामध्ये सिलबंद केले. जप्त करण्यात आलेले मासांचे नमुने सी.ए. तपासणीकामी पाठवण्याची तजवीज ठेवली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *