February 5, 2026


वाळुज महानगर – पीएमश्री जिल्हा परिषद प्रशाला तुर्काबाद (खराडी) ता. गंगापूर येथे कार्यरत विज्ञान शिक्षक अमरसिंह चंदेल यांना जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात येणारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला.

अमरसिंह चंदेल हे अतिशय उपक्रमशील असे विज्ञान शिक्षक आहेत. त्यांनी आजवर त्यांच्या कार्यकाळात या शाळेतून विज्ञान प्रदर्शन व अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा या स्पर्धेमध्ये 8 वेळा विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर नेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रशालेच्या तीन विद्यार्थिनींना विमानाने इसरोवारी त्यांनी घडवलेली आहे. त्याचबरोबर डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा असेल किंवा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा असेल या परीक्षेतही त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. दरवर्षी अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये जिवंत प्राण्यांचे हृदय, डोळे, मूत्रपिंड, पचन संस्था, मेंदू, यकृत, प्रजनन संस्था आदी अवयव प्रदर्शन व त्यांचे डिसेकशन हा त्यांचा उपक्रम जिल्हाभर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहलीचे आयोजन, विद्यार्थ्यांना विविध वक्तृत्व स्पर्धेत मार्गदर्शन करणे व यशस्वी पूर्ण सहभाग नोंदवणे अशा विविध उपक्रमांमध्ये ते व त्यांचे विद्यार्थी अग्रेसर असतात. या कामाची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सुदाम गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन नाडे, सरपंच कल्पना पाटेकर, उपसरपंच सुदर्शन प्रेमभरे, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, गट शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कुमार सखदेव, केंद्रप्रमुख केशव देसले, राष्ट्रीय धर्माचार्य हभप जनार्दन मेटे महाराज, किशोर निकुंभ, बापू कोठावदे, सोपान चव्हाण, निवेदिता ठाकूर, शिल्पा चौधरी, संजय गोठवाल, आशा चौधरी, रेखा सोळुंके, संगीता फिरके, विवेक येवले, वैशाली सावंत, सोनाली जाधव, मोहन सोलनकर, मिलिंद वाव्हळे, फारुख शेख, अमित रोकडे, योगेश दवंग आदींनी त्यांचे स्वागत केले. हा पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.

 

प्रतिक्रिया : प्रतिक्रिया :-

धर्माचार्य हभप जनार्दन मेटे महाराज –

सुदाम गायकवाड, मुख्याध्यापक पीएमश्री प्रशाला तुर्काबाद – आमच्या पीएमश्री प्रशालेचे विज्ञान शिक्षक अमरसिंह चंदेल हे अतिशय मेहनती, उपक्रमशील व प्रयोगशील असे शिक्षक आहेत. त्यांच्या विविध उपक्रमामुळे प्रशालेचे नावलौकिक सर्वदूर पोहोचले आहे. अगदी योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला.

नितीन नाडे, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती पीएमश्री प्रशाला तुर्काबाद – अमरसिंह चंदेल यांच्या कामामुळे आमच्या शाळेचे, गावाचे नावलौकिक झाले आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. अशीच सेवा त्यांच्या हातून घडो व आमच्या गावचे व विद्यार्थ्यांचे नावलौकिक वाढत राहो.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *