February 22, 2025

वाळूजमहानगरआझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम जिल्हाभर 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार असुन याचा शुभारंभ गुरुवारी (ता.15) सप्टेंबर रोजी तीसगाव येथे करण्यात आला. या प्रसंगी प्रभात फेरी काढुन स्वच्छतेबद्दल जनजागृती करत स्वच्छतेचे महत्व गावकरी यांना पटवून देण्यात आले.

दुष्यमान स्वच्छता ही थीम घेऊन ही मोहीम शासनाने राबविण्याचे ठरविण्यात आले असुन या काळात गावागावा स्वच्छता मोहीम राबविणे, सांडपाणी व्यवस्थापनच करुन त्याची योग्य विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर बंद करण्यासंदर्भात जनजागृती करणे. या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. या मध्ये सर्व गावकर्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ व सुंदर करावे. असे अवाहन स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी राजेंद्र देसले यांनी केले. यावेळी विस्तार आधिकारी विजय कुमार पंडित, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सत्यजित देशमुख, माहीती शिक्षण संवाद तज्ञ डाॅ.संजय वाघ, स्वच्छ भारत मिशन तालुका समन्वयक प्रमोद देशमुख, शाखा आभियंता उत्तम पवार, सरपंच शकुंतला कसुरे, उपसरपंच नागेश कुठारे, ग्रामविकास आधिकारी अशोक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, राजेश कसुरे, कृष्णा गायकवाड, नितीन जाधव, प्रविण हाडे, ईश्वरसिंग तरैय्यावाले, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल बनकर, अजय जमदाडे, हिरामण दणके, अशोक जाधव, ईंदुबाई साळे, शांता मोकळे, निशा वाघ यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ – तीसगाव येथे स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेली प्रभात फेरी.
…………

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *