
वाळूजमहानगर, (ता.17)- तिसगाव येथील साठेनगरात येथे साहित्यसम्राट लो.डॉ.अण्णाभाऊ साठे विकास मंडळ तर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
प्रथम साठेनागर तिसगाव येथील डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली तिसगाव ग्रामपंचायत मार्गे – नागसेन बुद्ध विहार अशी काढण्यात आली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळेस बाबासाहेबांना अभिवादनपर भाषणात न्यू इक्रा शाळेचे मुख्याध्यापक निलेश गोफणे यांनी सांगितले की, ज्ञान म्हणजे काय हे समजून घायचे असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वांनी वाचले पाहिजे. कारण ज्ञान म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 
यावेळी ज्ञानेश्वर नाडे, सुनील मोटे अण्णा, सुनील जोगदंड, सोपान नाडे, रॉबिन्सन कसबे, बाळू गायकवाड, कैलास शेलार, साबळे साहेब, अनिल आगळे, अमोल चंदू जोगदंड, सिमोल जोगदंड, किशोर जोगदंड, रवी जोगदंड, प्रेम जोगदंड, सचिन आव्हाड, राजेश बागुल, योगेश बागुल आदी उपस्थित होते.
