वाळूजमहानगर (ता.10) – भारत निवडणूक आयोगाने विशेष पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत तिसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 10 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच नागेश कुठारे हे होते.
या ग्रामसभेत तिसगाव परिसरातील भाग 13, 14, 15, 16, 17, 18 च्या मतदार याद्यांचे वाचन करण्यात आले. तसेच 1 जानेवारी 2023 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणार्या नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. याशिवाय मतदारांना यादी पाहण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध राहतील. असे सांगितले. यावेळी बीएलओ नितीन घोडके यांनी सर्व कार्यक्रमाची माहिती दिली. नागेश कुठारे यांच्या अध्यक्षीय मनोगताने ग्रामसभेचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गणेश बिलंगळ, प्रविण हाडे, काकासाहेब बुट्टे, ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, केंद्रस्तरीय अधिकारी नितीन घोडके, सविता बोईणे, सुजाता साळवे, संभाजी बनकर, हिरामण दणके, सुभाष लव्हाळे यांची उपस्थिती होती.