वाळुज महानगर (ता.4) – मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगाना या चार पैकी तीन राज्यात भाजपाच्या नरेंद्र मोदीचाच बोलबाला दिसून आल्याने वाळूज येथे भाजपा कार्यकर्त्याच्या वतीने फटाके फोडून रविवारी (ता.3) रोजी जल्लोष करण्यात आला.
वाळुज येथील जीवनलाल पाटणी प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशात लागलेल्या विधानसभा निकालात मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीनही राज्यात भारतीय जनता पार्टीने दणदणीत यश संपादन केले. सरकार स्थापन करण्यात सज्ज झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी किसान मोर्चा तालुकाप्रमुख बाबासाहेब शिंदे, तालुका सरचिटणीस जनार्धन गांधीले, सुनील मुळे, डॉ. सिटी पवार, जनार्दन चनघटे सुनील श्रीमाळी, नंदू सोनवणे, वल्ले पाटील, संदीप अंदुरे, तुकाराम मोटे, नामदेव इले, राजू पवार, हाफिज पटेल, अमोल शिंदे, सुखदेव जगताप, अशोक हिवाळे, किरण श्रीखंडे, नंदकुमार गांधीले, अविनाश गायकवाड, आशीर्वाद रोडगे, दर्शन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
