March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – सतत चोरी होणाऱ्या दुचाकीचा छडा लावण्यासाठी वाळुज एमायडीसी पोलिसांनी चक्रे फिरवले असता चोरीच्या गाड्या विक्रीसाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तीन आरोपी अडकले. त्यांच्याकडून अंदाजे दीड लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई शनिवारी (ता.4) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले यांनी दिलेली माहिती अशी की, सतत होणाऱ्या दुचाकींची चोरी रोखण्यासाठी आम्ही परिसरात गस्त घालित असताना माहिती मिळाली की, चोरीच्या गाड्या विक्री करण्यासाठी कामगार चौक येथे तीन इसम येणार आहे. या माहितीच्या आधारे शनिवारी (ता.4) रात्री 9 वाजेच्या सुमारास सापळा रचला असता आरोपी शुभम शांताराम जाधव (वय 20) रा. कुंभारगल्ली, वाळूज, अक्षय हिम्मत राठोड (वय 19) रा. बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनी (मूळ रा. शिंदखेड राजा ता. बुलढाणा व विष्णू ज्ञानेश्वर सोनवणे (वय 20) रा. वाळूज शिवराई हे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्या ताब्यातील दुचाकींबद्दल विचारणा केली असता त्यांनी योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्या ताब्यातील गाड्यांची चौकशी केली असता त्या चोरीच्या असल्याचे आढळून आले.
    या दुचाकी केल्या जप्त
निळ्या रंगाची बजाज विक्रांत V 15 दुचाकी चेसीस क्रमांक MD2A74BZ3GWM09856 व इंजिन नंबर / JHZWGM09703 15 किंमत 20,हजार रुपये, बजाज डिस्कव्हर दुचाकी चेसीस क्रमांक MD2A57AZ8EWD2107 व इंजिन नंबर PAZWEDD15116 किंमत 45 हजार रुपये, हिरो होन्डा पॅशन प्रो. दुचाकी चेसीस क्रमांक MBLA10AWDHHK 10057 इंजिन नंबर HA10ENDHK39972 किंमत 50हजार रुपये व यामाहा RX100 दुचाकी चेसीस क्रमांक IL1-185816.

     यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप गुरमे व पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुणावत, पोलीस उपनिरीक्षक अशोक रामचंद्र इंगोले, पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले, पोलीस नाईक विनोद नितनवरे, पोलीस अंमलदार सुरज अग्रवाल, पोलीस नाईक बाबासाहेब काकडे, विश्वनाथ गोबाडे, सुरेश कचे, अविनाश ढगे, वैभव गायकवाड, पंकज साळवे, पोलिस अंमलदार फिरोज तडवी, महेंद्र साळुंखे हनुमान ठोके यांच्या पथकाने केली.

अशी केली बनवाबनवी –

या गुन्ह्यातील आरोपी शुभम, अक्षय व विष्णू हे सराईत गुन्हेगार आहेत. विशेष म्हणजे या आरोपींनी चोरी केलेल्या दुचाकी कोणालाही ओळखू नये. म्हणून रंग बदलून व नंबर प्लेट चुकीचे टाकून बनवाबनवी केली असल्याचे या गुन्ह्यात उघडकीस आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *