March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.30) – वाळूज परिसरातील तिसगाव शिवारात एका शेतात आचनक आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (ता.29) दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.


तिसगाव गट नंबर 156,157 येथे कमलसिंग सूर्यंवशी याचे शेत आहे. या शेतात शनिवारी (ता.29) दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आचनक आग लागली.ही आग दहा ते पंधरा एकर परिसरात पसरली. आगीची माहिती मिळताच कमलसिंग सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, तुळशीराम देवकाते, शेरू खान, तेजस कापसे, विवेक सूर्यवंशी, बंडू जिते, कमलेश गिरी, आदित्य बांद्रे, लाल गिरी, जगन पोते आदींनी झाडांच्या फांद्या आणि मिळेल त्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग अधिकच भडकल्याने पाण्याचे खासगी तीन टँकर व अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र अग्निशामक दल उशिरा पोहोचले. तोपर्यंत गावकऱ्यांनीच ही आग नियंत्रणात आणली. या आगीत शेतातील पाईप व वायर जळून सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान सिडकोच्या सहायक वसाहत अधिकारी स्वाती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *