March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.31 – वाळूज परिसरातील तिसगाव येथे दरवर्षीप्रमाणे लक्ष्मी माता यात्रा उत्सवाचे आयोजन मंगळवारी (ता.1) रोजी पासून करण्यात आले आहे. ही यात्रा तीन दिवस सुरू राहणार आहे.

या यात्रा उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता.1) रोजी सायंकाळी पाच वाजेपासून संदल मिरवणूक, बुधवारी (ता.2) रोजी सायंकाळी पाच ते सात वाजे दरम्यान बारागाड्या ओढण्यात येणार आहे. व गुरुवारी (ता.3) रोजी दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. या यात्रा उत्सवाचा परिसरातील भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन तिसगावच्या सरपंच शकुंतला कसुरे, माजी सरपंच संजय जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, कमलसिंग सूर्यवंशी, राजेश कसुरे, रामा तरय्यावाले, रवी कसुरी आदींनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *