
वाळूजमहानगर, (ता.5) – तिसगाव येथे एका 35 वर्षीय तरुणाने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तिसगाव येथील राजू गिरधारी सूर्यवंशी (वय 35 वर्ष) याने राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच राजू सूर्यवंशी याला बेशुद्ध अवस्थेत सुशील सूर्यवंशी यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून दहा वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीचे जि.ओ. तुपे यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू सूर्यवंशी याने आत्महत्या केली की, हा वेगळाच प्रकार आहे. याची माहिती मात्र मिळू शकली नाही. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
