February 5, 2026

 

वाळुज महानगर, (ता.23) – तिसगाव येथील खवड्या डोंगराजवळ सुरू असलेल्या कुंटखान्यावर सोमवारी 22 डिसेंबर रोजी पोलीसांनी छापा मारून चार पिडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी याप्रकरणी 70 वर्षीय कुटंखाना चालक महिला व जागा मालक अशा दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोलापुर-धुळे महामार्गावरील खवडया डोंगराजवळील एका पत्र्याच्या शेड मध्ये कुटंनखाना सुरू असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ भागिरथी पवार, पोउपनि वसंत शेळके, शरिकांत सोनवणे, भास्कर गायकवाड, पोलीस अंमलदार फिरोज तडवी, महिला पोलीस अंमलदार प्रियंका रोडे यांच्या पथकाने सोमवारी 22 डिसेंबर रोजी रात्री 7:15 वाजेच्या सुमारास छापा मारला. चार महिलांना या ठिकाणी डांबून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याने पोलीसांनी त्यांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी कुटंखाना चालक महिला कडुबाई भिकन पवार (70) रा.पंढरपूर हिला ताब्यात घेतले. घटनास्थळावरून विविध प्रकारच्या साहित्यसह रोख 3 हजार 250 रुपये किमतीचा मुुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सतिष फुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कडुबाई पवार व जागा मालक शेख फरिद सांडू रा.पंढरपुर या दोघा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे करीत आहे़.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *