वाळूजमहानगर, ता.17 – तिसगाव येथे
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन हर्षदा शिरसाठ,
जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे व तिसगावच्या सरपंच शकुंतला लालचंद कसुरे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ढाकणे, गट विकास अधिकारी मिना रावतळे, सहगटविकास अधिकारी शिवाजी साळुंके, विस्तार अधिकारी देविदास मगर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे काम पूर्ण झाले. यावेळी उपसरपंच गणेश बिरंगळ, युवा सेनेचे तालुका अधिकारी राजेश कसुरे, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, प्रविण हाडे, कृष्णा गायकवाड, काकासाहेब बुट्टे, अरुणा जाधव, रेखा सूर्यवंशी तसेच वडगावचे सरपंच सुनिल काळे, संतोष नरवडे, लालचंद कसुरे, जि.प.प्रा. शाळेच्या मुख्यध्यापिका उषा साळवे यांच्यासह अंगणवाडी सेविका, अशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी व विद्यार्थी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी तर आभार ग्रामपंचायत अधिकारी हरिष आंधळे यांनी केले.
परीक्षार्थीचीही होणार सोय –
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या नागरी सुविधा सन 2022-23 व 2024-25 मधून ग्रामपंचायत तिसगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली ई- अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेत दिवाबत्ती सुविधा, अद्यावत फर्निचरची सोय असून गावातील व परिसरातील स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांची सोय होणार आहे.