March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – नैसर्गिक आपत्ती बरोबरच शेतीमालाच्या भावा विषयी संशयकता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक शेतीबरोबरच अधिक उत्पन्न व नफा देणार्या पिकांसह रेशीम शेतीकडे वळत याचे दिसून येत आहे.

शेती हा पारंपारिक व्यवसाय असला तरी त्यापासून अनेक जण दूर जाताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. खर्च अधिक, उत्पन्न कमी आणि हमीभावाचा पत्ताच नाही. शिवाय महागडे बी, बियाणे, खते, औषधी व बेपर्वा सरकार यांच्यासह नैसर्गिक आपत्ती. अशा अनेक संकटातून शेतकऱ्यांना जावं लागत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या हवालदिल होत आहे.

त्यामुळे नवीन काही करता येईल का याकडे शेतकरी वर्ग आकर्षित होत आहे. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे रेशीम शेती.

त्यामुळे पारंपारिक शेती व्यवसायाला फाटा देत गंगापूर तालुक्यातील येसगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती पिकवण्याकडे ओढ घेतली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी तुतीच्या लागवड केलेल्या बागा मधून शेतकऱ्यांना रेशीम उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. रेशीम कोषाला
बाजारपेठेत इतर पिकाच्या तुलनेत चांगला भाव मिळत असल्याने परिसरातील शेतकरी चांगलाच आनंदीत झाला
आहे. शासनाकडूनही रेशीम शेतीसाठी साडेतीन
लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळते.

म्हणून परिसरातील शेतकरी रेशीम शेतीच्या लागवडीकडे आकर्षित होत असतानाचे चित्र दिसून येत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *