
वाळूज महानगर, (ता.9) – गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती गंगापूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2023- 24 बजाजनगर येथे शुक्रवारी 8 सप्टेंबर 2023 रोजी झाला. त्यात शिवतेज विद्यामंदिर प्रशाला कमळापूर ता. गंगापूर शाळेने घवघवीत यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला.
या नाट्योत्सवात उत्सवात शिवतेज शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानव कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान- भरड धान्य सर्वश्रेष्ठ आहार या विषयावर नाटिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष व भरडधान्य आहाराचे महत्त्व उपस्थितांना पटवून सर्वांची मने जिंकली. त्यामुळे शाळा जिल्हास्तरावर गंगापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शाळेच्या यशाबद्दल गंगापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समाधान आरख, संस्थेचे अध्यक्ष भास्कर म्हस्के पाटील, मुख्याध्यापिका ज्योती नरवडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अजिनाथ मातेरे व सर्व शिक्षकांनी विजेत्या चमू चे स्वागत केले. जान्हवी जगताप, अनुष्का साळुंके, पुनम तोगे, पुनम भागडे, अनिकेत पवार, गणेश जाधव, साक्षी डोईफोडे, श्रावणी अक्कावार, प्रीती जाधव या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.
नाटिकेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सहशिक्षक कल्पना कानडे व नंदकिशोर आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले.
