
वाळूजमहानगर, (ता.20) – बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कामगार सेना गंगापूर तालुका अध्यक्षपदी जोगेश्वरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य हरिदास चव्हाण यांची निवड करण्यात आली.
पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निरफळ यांनी हरिदास चव्हाण यांना नियुक्ती पत्र दिले आहे. या नियुक्ती बद्दल हरिदास चव्हाण यांचे जोगेश्वरीसह वाळुज परिसरातील सर्वस्तरावर स्वागत करण्यात येत आहे.
