February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.30) – सोमवार पासून बेपत्ता असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह वडगाव (को.) येथील पाझर तलावात मंगळवारी (ता.30) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केली की, तो तलावात पोहतांना बुडाला. या विवंचनेत पोलीस सापडले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव (को.) परिसरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह तलावातील पाण्यात तरंगतांना मंगळवारी (ता.30) रोजी दुपारी 2 वाजेच्या तुम्हारा आढळून आला. ही माहिती सरपंच सुनील काळे यांना मिळाल्याने त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क करुन घटनेची माहिती दिली. या माहितीनंतर पोलीसांनी वाळूज अग्नीशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वाळूज अग्नीशमन विभागाचे के.टी.सुर्यवंशी, चालक डी.एन.चंद, फायरमन एन.एस.कुमावत, एस.जी.महाले, एन.एस.पारखे आदींनी पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्या अनोळखी तरुणाचा मृतदेह तलावातुन बाहेर काढला. नागरिकांनी तो ओळखून वडगाव येथील असल्याचे सांगितले. या माहितीनंतर पोलीसांनी नातेवाईकांशी संपर्क केला असता तो शुभम सोमनाथ जेऊघाले वय 23 याचाच असल्याचे उघड झाले. शुभम हा सोमवारपासून बेपत्ता होता. पोलीसांनी शुभम यास बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषीत केले. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परिसरात मोठी खळबळ
मयत शुभम जेऊझाले हा वडगावच्या सितानगरात आई-वडील व लहान भावासमवेत राहत होता. तो अविवाहित असून सोमवारी सांयकाळी 5 वाजेपासून तो घरातुन बेपत्ता झाला होता. मित्राकडे अथवा कामानिमित्त शुभम हा बाहेर गेला असावा. यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला नव्हता. मंगळवारी दुपारी शुभमचा मृतदेह तलावात तरंगतांना मिळून आल्याने त्याच्या कुंटुबियांनी आक्रोश केला. मयत शुभम याने आत्महत्या केली की, त्याचा कोणी घातपात केला? किंवा पाण्यात पोहतांना त्याचा बुडून मृत्यु झाला. या विवंचनेत पोलीस सापडले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *