February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.20) – वाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी भागात हातात तलवार आणि सुरा घेऊन दहशत माजवणाऱ्या परवेज उर्फ शाहरुख बाशीद शेख याला पोलिसांनी शिताफीने पकडून बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परवेज उर्फ शाहरुख बाशीद शेख हा परिसरात सतत भीतीचं वातावरण निर्माण करत नागरिकांना धमकावत होता. ही गोपनीय माहिती वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पथक रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्यासह पथकाने जोगेश्वरी परिसरात बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी सापळा रचून शाहरुखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे 5 हजार 500 रुपयांची एक धारदार तलवार आणि सुरा असे दोन शस्त्र जप्त करण्यात आला. या शस्त्रांच्या जोरावर तो स्थानिक परिसरात दहशत माजवत असल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेनंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                     यांनी केली कारवाई  –                                ही कारवाई पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्रा, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तसेच पोलीस कर्मचारी धिरज काबलिये, राजाराम वाघ, दिपक जाधव, सुरेश भिसे, रोहित चिंधाळे, जयेश साळुंके, सचिन ठोकळ, संतोष बमनात, संदीप तागड यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *