February 24, 2025


वाळुज महानगर, (ता.9)- मार लागलेल्या अवस्थेत अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या एका अनोळखी तरुणाचा गुरुवारी (ता.9) रोजी सकाळी मृतदेह आढळून आला. वाळुज एमआयडीसी पोलिसांनी त्यास घाटीत दाखल केले आहे. मात्र या तरुणाचा खून झाला की, नैसर्गिक मृत्यू या संभ्रमात पोलीस सापडले आहेत. दरम्यान या घटनेमुळे वाळूज औद्योगिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकातून औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या कडेला एक अंदाजे 30 ते 35 वर्षीय तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती गुरुवारी (ता.9) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मिळाली. त्यामुळे वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलीस कॉन्स्टेबल पंकज साळवे, सुहास मुंडे, बबलू थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या डोक्याला, चेहरावर मार लागल्याच्या खाणाखुणा असून अंगात काळसर शर्ट व काळसर पँट असे मळकट कपडे आहेत. रंग काळा सावळा, चेहरा सुजलेला, डाव्या डोळ्याजवळ मार लागल्याच्या खुणा, सडपातळ बांधा, केस काळे, वय अंदाजे 30 ते 35. असे या अनोळखी मयत तरुणाचे वर्णन आहे. त्याचा मृत्यू घाटीत दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोणास काही माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या वतीने करण्यात आले. आहे.

 

              हमाल किंवा गॅरेज कामगार –
या मयत तरुणाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता काही प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो काल दुपारपासून दारू पिलेल्या अवस्थेत पडून होता. अति दारू सेवन आणि त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. तो हमाली किंवा गॅरेजवर काम करीत असावा. अशी शक्यता त्याच्या मळकट कपड्यावरून वर्तविण्यात येत आहे.
                परिसरात खळबळ-
वाळुज औद्योगिक परिसरात केव्हाही काहीही घडू शकते. येथील कामगार चौकाजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने आणि त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा असल्याने त्याचा कोणी घातपात केला की काय. अशी शंका नागरिकांमधून उपस्थित केली जात असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *