वाळूजमहानगर, (ता.21) -12 वी बोर्ड परीक्षेत बजाजनगरच्या अयोध्यानगर येथील स्व. भैरोमल तनवाणी ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यानी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. या वर्षी देखील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यात वाणिज्य शाखेतून गुर्जार भारती पडुलाल हिने 91.17 गुण मिळवून प्रथम क्रमांक, बरकाडे ओमकार हनुमंत यांने 90.50 गुण प्राप्त करून द्वितीय क्रंमाक तर राजपुत आर्यन गणेश 90.17 गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच चतुर्थ श्रेणीत काकडे सुरज नरसिंग यांने 89 टक्के गुण मिळवून आकाऊंट या विषयात यांने 99 गुण मिळवीले आहे. विज्ञान शाखेतून देशमुख ऋषिकेश अजय याने 86.17 गुण मिळवून प्रथम क्रमांक, गोरे अनुष्का बाळासाहेब हींने 84.17 गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला, तसेच वर्मा श्रेया सुनिल व गोरे ऋतुजा किशोर या दोन्ही विद्यार्थिनीनी 84 टक्के गुण मिळवुण तृतीय क्रमांक मिळवला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, सचिव पंडित नवले, संचालक अशोक लगड विजय उखळे, राजेंद्र माने, तसेच कॉलेजच्या प्राचार्या अर्चना जाधव, पर्यवेक्षिका ज्योत्स्ना निलावाड, चंदनसिंग राजपुत, पवार प्रकाश, के आय शेख, शाहेद शेख, शुभागी निकम, सिमा पगारे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी स्वागत केले.