ढोरेगाव जवळ धावत्या बस पेटली,
चालक व वाहकांच्या सतर्कतेमुळे जीवितहाणी टळली
वाळूज महानगर, rknewslive-
नाशिकहून हिंगोलीकडे जाणार्या एसटी महामंडळाच्या बसने ढोरेगाव जवळ पेठ घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र चालक व वाहकाच्या सतर्कतेमुळे जीवितहाणी टळली. ही घटना सोमवारी (ता.22) रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास गंगापूर औरंगाबाद रोडवर घडली.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक वैजापूर गंगापूर औरंगाबाद मार्ग ही बस हिंगोली कडे जात होती. बसमध्ये सुमारे 24 प्रवासी होते. ढोरेगावजवळ सोमवारी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास या बसने पेट घेतला. घटनेची माहिती मिळतात पोलीस उपनिरीक्षक गीते, उपनिरीक्षक गणेश काथार, वाहतुक निरीक्षक पगारे, डेपो मॅनेजर शेळके यांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला. बस चालक रामेश्वर लोखंडे व वाहक मुकुंद पुंडलिक नारळे यांनी बस प्रसंगावधान दाखवत रोडचा बाजुला उभी करत बसमधील प्रवाशाना तात्काळ खाली उतरवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे मोठी जीवित हानी टळली. या घटनेत संपूर्ण बस जळाली असुन एस टी महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश काथार करत आहे.