March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता 22) – वाळूज येथील अण्णाभाऊ साठेनगरातील ड्रेनेजलाईन व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून येथील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवावे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक ते सुरक्षा विषयक साहित्य पुरविण्यात यावे. अशी मागणी बी पँथर कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे यांनी केली आहे.

वाळुज येथील अण्णाभाऊ साठे नगरात दोन-तीन गल्ल्यांमध्ये ड्रेनेज लाईन (भूमिगत गटार) चे दहा वर्षांपूर्वी काम झालेले आहे. परंतु अद्याप याची दुरुस्ती न झाल्यामुळे ड्रेनेज लाईनचे चेंबर ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे मेन होल चेंबरतून हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून बालक, वृद्ध, नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे. संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात ड्रेनेज लाईन काम करणारा एकमेव कामगार सौदी भाई हा असून त्याला सहकारी करणारा एकही कामगार नाही. व कुठलीच सेफ्टी सुविधा त्याला पुरवल्या जात नाही. त्यामुळे असे गलिच्छ काम करून त्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत तो कर्मचारी पूर्ण वाळुज गावचा भार संभाळतो असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. अण्णाभाऊ साठे नगरातील दलित वसाहतीकडे दोन ते तीन गल्ल्यांमध्ये अजूनही रस्त्याचे काम बाकी असून फेवर ब्लॉक बसवण्यात आलेल्या नाही.

दलित वस्तीचा निधी इतर ठिकाणी वळवला जात असून या दलित वस्ती कडे दुर्लक्ष केले जाते. ही खेदाची बाब आहे. वाळूज ग्रामपंचायतने अण्णाभाऊ साठे नगरातील संपूर्ण ड्रेनेजलाईनची साफसफाई करून व रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी. अन्यथा बी पँथर सामाजिक संघटना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे व इतर नागरिक करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *