वाळूजमहानगर, (ता.7) – लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रतिभा नितनवरे या होत्या तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक सुधाकर थोरात, संगणक शिक्षिका शिवकन्या कुकलारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषा परिधान करून शाळेत आल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी विचार मांडले. यावेळी प्रा. प्रतिभा नितनवरे व संगणक शिक्षिका शिवकन्या कुकलारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ऋतुजा कुर्हाडे तर आभार प्रणिता कुर्हाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
—————
