March 23, 2026

वाळुज महानगर (ता.11) :- रस्त्याने जात असलेल्या एकाच गावातील दोघांमध्ये साईड देण्याच्या कारणावरून हमरीतुमरी झाल्याने 51 वर्षीय इसमासच्या डोक्यात फावडे मारून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता.10) रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मुरमी येथे घडली.

मुरमी तालुका गंगापूर येथील संजय ओमकार राजुळे (वय 51) हे नातीला घेऊन दुचाकी वरून गुरुवारी (ता.10) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुरमी गावातून मुरमी फाट्याकडे जात होते. तर शेख कलीम शेख फकिर रा. मुरमी ता. गंगापूर हा त्याचे पाण्याचे ट्रॅक्टर (एम एच 20,सीआर – 4776) हे घेऊन जात होता. यावेळी संजय राजूळे यांनी शेख कलीम यास वारंवार हॉर्न दिला. परंतु कलीम याने साईड दिली नाही. त्यामुळे शेख कलीम व संजय राजूळे यांच्यात साईड देण्याच्या कारणावरून हमरीतुमरी झाली. यावेळी शेख कलीम याने राजूळे यांना शिवीगाळ करून तुला पाहून घेतो. अशी धमकी दिली. तसेच सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास राजूळे हे घरी असताना आरोपी शेख कलीम हा त्याचे ट्रॅक्टर घेऊन राजूळेच्या घरासमोर आला व मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने संजय राजूळेच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून जखमी केले. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *