
वाळूजमहानगर, (ता.26) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज कंपनीचे मानव संसाधन अधिकारी तथा एच आर प्रमुख तसेच पर्यावरण प्रेमी डॉ. व्यंकट मैलापुरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्याच हस्ते छत्रपती संभाजीराजे वृक्ष बँक, उपशाखा नंबर-1, ची स्थापना 22 जुलै 2023 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आली. 
रामलीला मैदान बजाजनगर येथे सकाळी साडेआठ वाजता आलेल्या या कार्यक्रमाला हभप परमानंद गिरी महाराज, पर्यावरण प्रेमी पोपटराव रसाळ, मनोज कदम, मनोज जैन, अमृत मराठे, हरी वाकळे, योगेश दापते, प्रदीप दापते, डॉ.अर्चना राठोड, जय उपासे, प्रा.जयश्री पवार, डॉ एम.डी संकपाळ, डॉ. आर के सिंग, भगवान सदावर्ते, प्रफुल्ल कांबळे, एकनाथ पवार, रमेश बिरादार, संतोष कोटकर, वसंत कपाटे, योगेश पाटील, सचिन घायवत, मनीष देशमुख, संतोष महाले, संदीप पाटील, नितीन अंबोरे, दिनेश दापके तसेच बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर शहर, वाळुज महानगर -1, क्रांतीनगर साजापूर, रांजणगाव, वडगाव, करोडी आदी परिसरातून पर्यावरण प्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर व्यंकट मैलापुरे यांनी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अंभोरे यांनी केले. तर आभार योगेश दापते यांनी मानले.
नागरिकांना मोफत देण्यात येणार –
या वृक्ष बँकेत पर्यावरण पूरक देशी झाडे तसेच आयुर्वेदिक आणि दुर्मिळ प्रजातीची रोपे तयार करून ती मोठी झाल्यानंतर म्हणजेच दीड वर्षानंतर बजाजनगर परिसरातील नागरिकांना मोफत देण्यात येणार आहेत. जेणेकरून परिसर हिरवागार राहील तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील.
