वाळूजमहानगर (ता.29) :- राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वाळूज महानगरातील डॉ. बी. जी. गायकवाड यांना मॅजिक युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या वतीने डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गायकवाड यांची मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमधेही नोंद करण्यात आली आहे.
ही पदवी डिसेंबर रोजी होणाऱ्या दीक्षान्त समारंभात गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल एस. एस. पवळे, एस. टी. गायकवाड, प्रा. सुनील मगरे, देवानंद वानखेडे, डॉ. संजय काळे, डॉ. अनिल पांडे, विलास जगताप, अब्दुल चाऊस, यशश्री विद्यालयाचे मुध्याध्यापक लक्ष्मण हिवाळे, डॉ. प्रशांत होशिळ. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आदिंसह विविध संस्था, संघटनांतर्फे गायकवाड यांचे स्वागत केले आहे.