
वाळुज महानगर, (ता.10) – लिंबे जळगाव येथे मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. या मोकाट डुकराच्या हल्ल्यामुळे गावात येणारा एक जण जखमी झाला. ही घटना बुधवारी 9 जुलै रोजी घडली. या घटनेमुळे लहान लहान विद्यार्थी व महिला भयभीत झाल्या आहेत.
लिंबेजळगाव येथे जवळपास 125 ते 150 हुन अधिक डुक्कर आहेत. त्यामुळे गावात डुकरांचा (वराह) सुळसुळाट झाला असुन गावात येजा करणाऱ्यांना ते चावा घेत आहेत. बुधवारी 9 जुलै रोजी नानासाहेब पाटील (वय 58) रा शेवगाव हे गावात आले असता गावातील एका डुकराने त्यांना चावा घेतल्याने नानासाहेब पाटील हे जखमी झाले.
या घटनेमुळे गावातील लहान लहान विद्यार्थी मुली व महिला भयभीत झाल्या आहेत. लिंबे जळगाव येथे अनेक प्लॉट व खुल्या जागा आहेत या खुल्या जागांमध्ये पावसाचे तसेच गटाराचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले त्यामुळे या डब्यात मोकाट डुकरं मुक्त संचार करतात. येथे विशेषता बाल वर्गात शिकणारे लहान लहान विद्यार्थी, मुली व महिला यांना नेहमी घराबाहेर पडावे लागतेत विद्यार्थी शाळेत ये जा करतात अशावेळी या डुकरांचा हल्ला त्यांच्यावर होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेख सांडू, आप्पासाहेब पडघण, रवीं ठोबरे, संजय जगताप, अप्सर शेख, भाऊसाहेब तारक, लतीप पठाण, संभाजी जाधव आदींनी केली आहे.
