March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील दुचाकी वर जाणाऱ्या एका लेबर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझरला सात ते आठ जणांनी रस्त्यात अडवून, धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून खिशातील 17 हजार रुपये बळजबरीने इस्कॉन घेतले. व त्याची दुचाकी पेटवून दिली. ही घटना सोमवारी (ता.16) रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास वडगाव गट नंबर मध्ये घडली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचात परमेश्वर वानखेडे हा लेबर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर आहे. तो वडगाव कोल्हाटी गट नं 6मध्ये राहतो. दिवसभराचे काम केल्यानंतर सोमवारी (ता.16) रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास वानखेडे हादुचाकी वरुन कंपनीतून वडगाव को गट नंबर कडे जात होता. रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास तो रस्त्याने जात असताना गट नंबर मधील रस्त्यात असलेल्या खदानी जवळ सात ते आठ जणांनी त्याची दुचाकी अडवली.

 

आणि धारदार शस्त्राने मारहाण करून त्याच्या खिशातील 17 ते 18 हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी वानखेडे याची दुचाकी पेटवून दिली. या घटनेत जखमी झालेला वानखेडे हा आरोपींच्या तावडीतून कसा बसा पळाला. त्यानंतर त्याने मित्राला बोलावून पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. या घटनेची वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *