March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.29) – पुण्याकडून वाळूज, छत्रपती संभाजीनगर मार्गे हिंगोलीकडे जाणाऱ्या एका खाजगी बसवर अज्ञात आरोपींनी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने बस मधील तीस ते चाळीस प्रवासी सुखरूप आहेत. शनिवारी (ता.29) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास झालेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हिंगोली येथील एका खाजगी बस (एम एच 38, एफ -2099) (खुराणा ट्रॅव्हल्स) पुण्यावरून वाळुज, छत्रपती संभाजीनगर मार्गे हिंगोलीकडे जात असताना छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथे शनिवारी (ता.29) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करून हल्ला केला. या हल्ल्यात खुराणा ट्रॅव्हल बसच्या समोरील काचा फुटल्याने बस मधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. या ट्रॅव्हल्स मध्ये 30 ते 40 प्रवासी असल्याचे सांगितल्या जाते. पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. वाळूज परिसरातील जिकठाण शिवारात दोन दुचाकी स्वारांना लुटल्यानंतर खाजगी ट्रॅव्हल बसवर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याच्या या घटनेमुळे वाळूज परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाश्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *