February 5, 2026

वाळुज महानगर, (18) – ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून रस्ता ओलांडणारा 51 वर्षीय इसम जागीच ठार. हा अपघात रविवारी 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाळूज गावात झाला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, बदनापूर जवळील कान्हेवाडी शेकटा येथील शिवनाथ एकनाथ पवार. वय 51 वर्ष लाकूडतोडे चा व्यवसाय करतो. वाळुज जवळील शिवराई गावात राहतो. रविवारी 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिवनाथ पवार हा रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पंढरपूरकडून गंगापूरच्या दिशेने जात होता.

दोन ट्रॉली असलेल्या या ट्रॅक्टरच्या चाकाखाली शिवनाथ पवार हा आल्याने तो चिरडून गंभीर जखमी झाला. त्याला भारत साबळे, विठ्ठल पवार यांनी उपचारार्थ घाटी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
याप्रकरणी घाटी मेडीकल चौकीचे पोलीस हवालदार ए.आर.गवळी यांनी दिलेल्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भीमराव शेळके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *