March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.7) – घेतलेल्या कच्च्या मालाचे बिल अदा करण्यासाठी ट्रान्सफर केलेली 4 लाख 8 हजार 217 रुपयेची रक्कम मुंबई येथील कंपनीला न जाता दुसऱ्याच्याच नावावर गेल्याने वाळुज येथील एका इंजिनिअरिंग कपंनीची फसवणुक झाली. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीत प्रदिप चंद्रभान राऊत व सिमा प्रदिप राऊत यांची गट नं 58 प्लॉट 25 येथे आर एस इंजिनिअरिंग नावाची कपंनी आहे. या कंपनीत नटबोल्ट बनविल्या जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल प्रिसाईज अलाईज प्रा. लिमीटेड मुंबई या कंपनीकडून मागील सात ते आठ वर्षपासुन मागविला जात होता. आर एस इंजिनिअरिंग कंपनीने प्रिसाईज अलाईज प्रा. लिमीटेड या कपंनीकडून 6,11 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी कंपनीला कच्चा माल घेतला होता. या मालाची रक्कम 4 लाख 8 हजार 217 रुपये झाली होती. दरम्यान अज्ञात आरोपीने प्रिसाईज आलाईज प्रा. लि. मुंबई या नावाने बॅक खाते उघडले. हे माहित झाल्याने या खात्यावर कोणतेही बिल जमा करून नये. तसेच खोट्या खात्याची संपुर्ण माहिती याबाबदचा ईमल प्रिसाईज अलाईज प्रा लिमीटेड मुंबई या कंपनीने वाळुज येथील आर एस इंजिनिअरिंग कपंनीला पाठविला होता. पंरतु तो ईमेल न वाचता दिलेल्या नेहमीच्याच
खात्यावर पैस पाठवायचे आहे़. असे वाटून 19 एप्रिल 2023 व 5 मे 2023 रोजी 4 लाख 8 हजार 219 रूपये खात्यात ट्रान्सपर केले.

त्यानंतर 6 में 2023 रोजी प्रिसाईज आलाईज प्रा लिमीटेड मुंबई कंपनीने फोन करून आर एस इंजिनिअरिंग कपंनीला बिलाची मागणी केली. त्यावेळी कंपनीने पैसे ट्रान्सपर केल्याची माहिती पाठविला असता, ते चुकीच्या खात्यावर पाठविल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीने पोलीस आयुक्त व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलीसांनी गुन्हा नोंदविण्याबाबाद नकार दिला.त्यानंतर न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.6) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि स्वाती उचित करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *