वाळूजमहानगर, ता.5 – वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत ट्रकमधून सामान उतरवीत असताना 30 जानेवारी रोजी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास खाली पडून 76 वर्षीय वृद्ध इसमाचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता.4) रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथील शेषराव सजन सौदागर (वय 76) हे 30 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास वैष्णोदेवी मंदिराजवळ असलेल्या साई ऑटो करपेटींन या कंपनीमध्ये ट्रक मधुन सामान उतरवीत होते. ते ट्रक मधुन खाली पडुन गंभीर जखमी झाल्याने त्यास राजु शेषराव सौदागर व ताराबाई गणेश सौदागर यांनी उपचारार्थ
प्रथम बजाजनगर व तेथुन घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी शेषराव यास तपासुन मंगळवारी ता चार रोजी सकाळी 8 वाजता मयत घोषित केले. या प्रकरणी घाटी मेडिकल चौकीतून आलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.