वाळूजमहानगर, ता.6 (बातमीदार) – ट्रकमध्ये झोपलेल्या ट्रक चालकाच्या खिशातून एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरी हिस्काऊन पळून गेले. ही घटना बुधवारी (ता.5) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील इंडुरन्स के-226 या कंपनीच्या समोर (ट्रक एम एच 20, जी सी-2171) चा चालक सागर ज्ञानोबा हावळे रा. गणपती मंदिरजवळ बजाजनगर हा बुधवारी (ता.5) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास कॅबीनमध्ये झोपलेला होता. त्याचवेळी ट्रकच्या पाठीमागुन तीन अनोळखी इसम आले. त्यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये चढवून ट्रक चालकाच्या खिश्यात हात घातला. त्याचवेळी ट्रक चालकाला जाग आली. मात्र तरीही आरोपींनी 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून चालकाला धक्का देत दुचाकी (एम एच20, डी झेड – 5747) वर बसुन पळुन गेले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
